बातम्या
राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी
By nisha patil - 10/26/2023 12:56:52 PM
Share This News:
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज चांगलाच आक्रमण झाला आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे
व खिंडी व्हरवडे या दोन गावात आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश नाही तर आगामी सर्व निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय घेणारी कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली दोन गावे आहेत
मराठा आरक्षण प्रश्न सरकारने 30 दिवसांचा वेळ घेतला होता आज 41 दिवस झाले मात्र सरकारने यावर कोणत्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे मराठी बांधवांनी आत्महत्या न करता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात प्रवेश नाही मात्र हे करत असताना कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे
राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी
|