बातम्या

भारत सरकार ऐवजी मोदी सरकार लिहिलेल्या चित्र रथाला ग्रामस्थांकडून विरोध

Villagers oppose Chitra Ratha written by Modi Government instead of Government of India


By nisha patil - 12/14/2023 3:53:37 PM
Share This News:



केंद्र सरकारच्या वतीने गेल्या दहा वर्षात राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी हा चित्ररथ गावोगावी फिरत आहे. आज सकाळी अकरा वाजता शिरोली  येथील ग्रामपंचायती समोर संयोजक पोष्टर व चित्ररथातील स्क्रीनवरून विविध सरकारी योजनांची माहिती देत असताना संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र व अन्य ग्रामस्थांनी त्यावर आक्षेप घेतला. चित्ररथ सरकारी आहे तर त्यावर भारत सरकार ऐवजी मोठया अक्षरात मोदी सरकारची हमी असा उल्लेख का आहे. चित्ररथावर भारताचा लोगो का नाही.रथ सजावटीत तिरंग्या ऐवजी जाणीवपूर्वक राजकीय पक्षाच्या झेंड्याचे रंग का वापरले . भारतीय जनता पक्ष सरकारी यंत्रणांचा वापर करत अप्रत्यक्षपणे स्वतःच्या पक्षाचा प्रचार करते आहे का? असे प्रश्न उपस्थित करून ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 
     

अधिकारी व ग्रामस्थामधील वादात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजवैभव यांना पोलिसात देण्याची धमकी दिल्याने प्रकरण अधिकच चिघळले होते. 
अखेर संयोजकांनी चित्ररथ माघारी नेण्याचा निर्णय घेतल्याने वादावर पडदा पडला.
 

 यावेळी हरी आबा चौगले, गोपाळ पाटील,प्रकाश चौगले आदी मान्यवरांसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते
 


भारत सरकार ऐवजी मोदी सरकार लिहिलेल्या चित्र रथाला ग्रामस्थांकडून विरोध