शैक्षणिक
विमला गोयंका इंग्लिश मीडिया स्कूलची चौकशी करून केली जाणार कारवाई
By nisha patil - 11/2/2025 3:21:46 PM
Share This News:
विमला गोयंका इंग्लिश मीडिया शाळेमध्ये बारावीच्या परीक्षा प्रवेशपत्रिकेवरून खुप गोंधळ उडलाय. प्रवेशपत्रिकेवर वेगळेच विषय आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीची व शाळेची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती सोमवारी व्हिडीओद्वारे शरद गोसावींनी दिलीय.
यावेळी गोसावी म्हणाले, या शाळेत प्रवेश देताना विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स व क्रॉप सायन्स, असे विषय सांगण्यात आले होते. मात्र, या शाळेला या दोन्ही विषयांची मान्यताच नाही. बारावी परीक्षेचे अर्ज भरता शाळेने मराठी आणि भूगोल हेच विषय लिहिले. हॉल तिकीट मिळाल्यावर विद्यार्थांना कॉम्प्युटर सायन्स, क्रॉप सायन्स हे विषय घेता येणार नसल्याचे समजले. पालकांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर राज्य मंडळाने विद्यार्थांनी ज्या विषयाचा अभ्यास केला, त्या विषयाचे हॉल तिकीट दिलेत.
विमला गोयंका इंग्लिश मीडिया स्कूलची चौकशी करून केली जाणार कारवाई
|