राजकीय

पन्हाळा शाहूवाडीत निकाला आधीच विनय कोरे यांचे बॅनर झळकले..

Vinay Kores banner was already visible in Panhala Shahuwadi


By Administrator - 11/22/2024 12:52:48 PM
Share This News:



पन्हाळा शाहूवाडीत निकाला आधीच विनय कोरे यांचे बॅनर झळकले..

अति आत्मविश्वास नढणार की फळणार उद्या कळणार...
 
पन्हाळा-शाहुवाडी विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. यंदा देखील या मतदारसंघात रंगतदार लढत पाहायला मिळाली. बुधवारी मतदान शांततेत पार पडले असून, आता सगळ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मतदारसंघातील दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांनी विजयाबाबत विविध तर्कवितर्क लावायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, आमदार विनय कोरे यांच्या समर्थकांनी मात्र निकाला आधीच विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. पन्हाळा-शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी कोरे यांच्या विजयाचे बॅनर झळकवण्यात आले आहेत. या बॅनर्सवर केवळ आमदारकीच नाही तर मंत्रिपद मिळण्याचाही दावा करण्यात आला आहे. “आमदार कोरे यांचे नेतृत्व हे विकासाभिमुख असून, यावेळीही मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने असेल,” असे समर्थकांचे म्हणणे आहे.


पन्हाळा शाहूवाडीत निकाला आधीच विनय कोरे यांचे बॅनर झळकले..