बातम्या
शहापूर परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन
By nisha patil - 2/28/2025 12:27:00 PM
Share This News:
शहापूर परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन
ठाकरे गटाचा आयुक्तांना इशारा...
इचलकरंजी-शहापूर परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा इचलकरंजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने एका निवेदनाद्वारे आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आलंय. म्हसोबा देवाची यात्रा जवळ आली असून एक एप्रिल रोजी श्री ग्रामदैवत मसोबा देवाची यात्रा असून शहापूर ते म्हसोबा देवालय पर्यंत चा रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे.
वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होणारी वाहतूक कोंडी दूर करावी जर येत्या पंधरा दिवसांमध्ये सदर रस्त्यांचे हॉट मिक्स पद्धतीने डांबरीकरण न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख वैभव उगळे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश बोहरा, शिवसेना तालुकाप्रमुख आनंद शेट्टी, शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण, माजी शहरप्रमुख धनाजी मोरे, युवासेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहापूर परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन
|