बातम्या
कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने राहुल नार्वेकरांच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन
By neeta - 11/1/2024 4:38:57 PM
Share This News:
कोल्हापूर : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात आज सर्वपक्षीय इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापुरात आज सकाळी काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार आली. यावेळी लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या नार्वेकराला धिक्कार असो या सरकारच करायच काय ? खाली डोकं वय पाय, हा नार्वेकर कोण रे पायतानं मारा दोन रे अशी जोरदार घोषणाबाजी करत नार्वेकरांच्या निर्णयाला तीव्र विरोध केल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले, कालचा दिवस हा लोकशाहीच्या दृष्टीने काळा दिवस होता. सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत कुठल्यातरी दबावापोटी, किंवा हुकूमशाही असे अनेक कारणाने या लोकांनी सर्वोच्च न्यायालयाला ही कमी दाखवले आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली आहे, त्या घटनेची ही पायमल्ली केली गेली आहे. या लोकशाहीची हत्या केली आहे याचा निषेध जेवढा करेल तेवढा कमी आहे. या पापेला कुणीही माफी करणार नाही. सर्वोच्च न्यायालयाला बाजूला सरून आपल्या अधिकारांचा गैरवापर करत हा निर्णय दिला गेला आहे असे ते म्हणाले.
आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊच, परंतु हा देश लोकशाही संपवून हिटलरकडे वळत चालत आहे. आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय घेऊ सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय आम्हाला नक्कीच न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे असे शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते
यावेळी शिवसेना उपनेत संजय पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष व्ही. बी.पाटील, आर.के.पवार,रामराजे कुपेकर, माजी आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार सुजीत मिणचेकर,विजय देवणे,भरत रसाळे,अनिल पाटील, बाजीराव पाटील, राजू यादव,प्रतिज्ञा उत्तुरे,महेश उत्तुरे, मंजीत माने, आदीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने राहुल नार्वेकरांच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन
|