बातम्या

उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ भाजपाची जोरदार निदर्शने

Violent protests by BJP to protest the contempt of the Vice President


By nisha patil - 12/21/2023 6:59:28 PM
Share This News:



 उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ भाजपाची जोरदार निदर्शने

तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा अवमान करणारे असभ्य आणि अशोभनीय वर्तन केले आणि या सर्वांचे चित्रीकरण राहुल गांधी करीत होते याच्या निषेधार्थ  कोल्हापुरात भाजपावतीने बिंदू चौक याठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत कल्याण बॅनर्जी, राहूल गांधी, कॉंग्रेसच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळ जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, ज्या व्यक्तीला देशाचा द्वितीय नागरिक, महामहीम संबोधले जाते, ज्यांना राजशिष्टाचार, विशिष्ट  प्रोटोकॉल असतो अशा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अवमान झाला आहे.
यात दुर्देवाची बाब म्हणजे या सर्वांचे चित्रीकरण खुद्द राहुल गांधी करत आहेत.  कॉंग्रेसचे सर्वच नेते सत्तेस नसल्याने वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच अशा पद्धतीचे कृत्य करताना दिसत आहेत. हि घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा भाजपाच्यावतीने तीव्र निषेध करत असल्याचं सांगितलं.  यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ भाजपाची जोरदार निदर्शने