बातम्या

विराट कोहली गुपचूप करतोय T20 निवृत्तीची तयारी..?

Virat Kohli secretly preparing for T20 retirement


By nisha patil - 11/30/2023 4:56:13 PM
Share This News:



विराट कोहली गुपचूप करतोय  T20 निवृत्तीची तयारी..? 

T20 पासून स्वतःला का ठेवतोय दूर? 

विराट कोहलीचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर व्हाइट बॉल सीरिज खेळण्यास नकार


आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023  मध्ये चमकदार कामगिरी करणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर व्हाइट बॉल सीरिज खेळण्यास नकार दिला आहे. कोहलीच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023  मध्ये चमकदार कामगिरी करणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली  सध्या लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतोय. .त्याच्यासाबोटच रोहित शर्मा ही लंडनमध्ये वेकेशन करतोय. तर  दुसरीकडे, सूर्यकुमार यादवच्या  नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आपल्या  ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये टीम इंडिया पहिल्या 3 सामन्यांत 2-1 नं आघाडीवर आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजनंतर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. पण त्याआधीच किंग कोहलीच्या एका निर्णयानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कोहलीनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर व्हाइट बॉल सीरिज खेळण्यास नकार दिला आहे. कोहलीच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. 
  मीडिया  रिपोर्टनुसार, विराट कोहलीनं बीसीसीआय आणि सिलेक्शन कमेटीला सांगितलंय की, तो व्हाईट बॉलनं क्रिकेट खेळण्यासाठी कधीपासून उपलब्ध असले, याबाबत तो स्वतः माहिती देईल. दरम्यान, कोहलीनं यापूर्वीही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 12 महिन्यांमध्ये अनेकदा कोहलीनं कोणत्या ना कोणत्या कारणानं या फॉरमॅटपासून अंतर राखल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. त्यामुळे तो t ,२० मधून गुपचूप निवृत्तीची तयारी करतोय की काय असे अनेक तर्क वितर्क सध्या सोशल मीडियावर लावले जात आहेत.


विराट कोहली गुपचूप करतोय T20 निवृत्तीची तयारी..?