बातम्या

वीरेंद्र मंडलिक यांचे शाहू महाराज छत्रपती यांच्या बद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान...

Virendra Mandliks once again controversial statement about Shahu Maharaj Chhatrapati


By nisha patil - 4/20/2024 1:20:53 PM
Share This News:



गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची रणधुमाळी सगळीकडे सुरू असून एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरू असल्याचे चित्र सगळीकडे पहावयास मिळत आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खा. संजय मंडलिक यांनी  शाहू महाराज छत्रपती यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करून रोष ओढवून घेतला आणि ते त्या विधानावर ठाम देखील राहिले.या विधानानंतर राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठली होती. या घटनेनंतर आता संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनीही शाहू महाराज यांच्यावर टीकास्त्र सोडले असून शाहू महाराज नावाला  साजेस काम केले नसल्याचे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. ते काम राजे विक्रम सिंह घाटगे व समरजीत सिंह घाटगे यांनी केले असल्याचंही वीरेंद्र मंडलिक यांनी म्हटलं आहे. राजर्षी शाहूंच्या नावाने त्यांना एकही उद्योग  काढता आला नसून अनेक वर्षापासून बंद असलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आली नसल्याचे म्हणत त्याने शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.


वीरेंद्र मंडलिक यांचे शाहू महाराज छत्रपती यांच्या बद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान...