बातम्या
आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल : आ.सतेज पाटील
By Administrator - 8/22/2023 2:12:22 PM
Share This News:
कोल्हापूर आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले . शिवाजी विद्यापीठातील प्रा. सुधीर देसाई व डॉ. वैशाली भोसले यांनी इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेल्या 'शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाचा वापर' या प्रणालीच्या वापरा संबंधीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आ. सतेज पाटील यांच्या हस्ते झाले.
तत्कालीन पालकमंत्री आ.सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी ७५ लाख ४० हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला होता.
आ.पाटील पुढे म्हणाले, या प्रणालीमुळे विज्ञानातील क्लिष्ट व किचकट संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून घेण्यास सोप्या जातील.यामुळे त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित लाभ होईल. प्रा. देसाई आणि डॉ.भोसले यांचे आ.पाटील यांनी विशेष अभिनंदन केले.
प्रा.सुधीर देसाई यांनी सांगितले की, ही प्रणाली गुगल प्ले स्टोअर वर SUK-AR या नावाने विनामूल्य उपलब्ध आहे. हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये AR CORE सपोर्ट असणे गरजेचे आहे. AR CORE सपोर्ट मोबाईलची लिस्ट गुगल सर्च इंजिन वर उपलब्ध आहे. अँप्लिकेशन वापरा संबंधीची माहिती पुस्तिका शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांनी वापर करावा.
यावेळी डॉ. वैशाली भोसले प्रा. सुधीर देसाई डॉ.अजित कोळेकर, अविनाश उत्तुरकर, रोहित निंबाळकर ,हेतवी शाह, पंकज कांबळे उपस्थित होते.
आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल : आ.सतेज पाटील
|