बातम्या
विशाल पाटलांचं भाषण संसदेत पहिला प्रश्न
By nisha patil - 7/25/2024 2:47:52 PM
Share This News:
सांगली हा राज्यातील लोकसभा निवडणुकीत यंदा लक्षणीय लोकसभा मतदारसंघ ठरला. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंत दादा पाटील यांच्या नातवाने इच्छा जाहीर करुनही काँग्रेसला ही जागा सुटली नाही. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. त्यानंतर, काँग्रेसकडून तयारी केलेल्या आणि इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. आता, लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील सर्वच खासदार दिल्लीत पोहोचले आहे. आज खासदार विशाल पाटील यांनी संसदेत आपलं पहिलं भाषण केलं आणि सांगली , कोल्हापूर व सामीवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अपक्ष मैदानात उतरत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील व महायुतीच्या संजय काका पाटील यांचा पराभव केला. विशेष म्हणजे काँग्रेसने या निवडणुकीत माघार घेतली तरीही स्थानिक नेत्यांनी छुप्यारितीने विशाल पाटील यांनाच मदत केली. त्यामुळे, अपक्ष निवडणूक लढवूनही विशाल पाटील यांनी विजय मिळवला. निवडणूक निकालानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसला आपला पाठिंबाही जाहीर केला आहे. तर, काँग्रेसकडूनही त्यांच्यावर बेशिस्त किंवा बंडखोरी केल्याबाबत कुठली ही कारवाई करण्यात आली नाही.
विशाल पाटलांचं भाषण संसदेत पहिला प्रश्न
|