बातम्या

हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचे दर्शन ; मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय

Vision of Hindu Muslim unity Big decision of Muslim brothers


By nisha patil - 6/22/2023 5:16:56 PM
Share This News:



 हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचे दर्शन छत्रपती संभाजीनगरमध्ये घडले आहे. आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या निघाले आहे. या पालखीत अनेक मुस्लिम बांधवही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. येत्या 29 जून रोजी आषाढी एकादशी असून याच दिवशी मुस्लीम समुदायाचा पवित्र सण बकरी ईदही आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समुदायाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील पंढरपूर येथील गावकऱ्यांनी बकरी ईद आषाढी वारीच्या दिवशी साजरी करण्याऐवजी दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव बकरीची कुर्बानी देतात, तर आषाढी वारीला वारकऱ्यांचा उपवास असतो. मात्र यावेळी त्यांनी हिंदू बांधवांचा अवमान होऊ नये, यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 जून रोजी बकरी ईद साजरा करणार असल्याचे सांगितले आहे.

याबाबत पंढरपूरचे माजी सरपंच शेख अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला अधिक माहिती दिली आहे. शेख अख्तर म्हणाले की, “आमच्या गावात आषाढी वारीला जवळपास 15 लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मुस्लीम समुदायाला विनंती आहे  की, बंधुभावाचा संदेश सर्वत्र पोहोचवा आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करा. बकरी ईद 29 ऐवजी 30 तारखेला साजरी करावी. आमच्या गावात आम्ही बकरी ईदला कुर्बानी देणार नाही. तर दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करणार आहोत.” छत्रपती संभाजीनगरमधील पंढरपूरला प्रती पंढरपूर मानले जाते. त्यामुळे मोठ्या संख्या नागरिक येथे दर्शनाला येत असतात.


हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचे दर्शन ; मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय