बातम्या

'B'जीवनसत्त्व रोखते पक्षाघाताचा झटका

Vitamin B prevents stroke


By nisha patil - 8/25/2023 7:41:46 AM
Share This News:




पक्षाघाताचा झटका बहुतांश प्रौढ वयात येतो. बदलती अनिमित जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वेळी-अवेळी खाणे ही पक्षाघात होणची प्रमुख कारणे असू शकतात. मात्र 'ब' जीवनसत्त्वांचे नियमित सेवन केल्यास पक्षाघाताचा झटका रोखला जाऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी तब्बल 54,913 जणांच्या चाचण्या घेतल्या. 14 वेळा क्लिनिकल चाचण्या करून हे निष्कर्ष जाहीर केले. या सर्वाना बी जीवनसत्त्वाचा डोस देऊन अभ्यासाचे निष्कर्ष तपासण्यात आले. 2471 पक्षाघातांचा तपास केला.

त्यात 'ब' जीवनसत्त्व घेण्याचे फायदे दिसून आले. ब जीवनसत्त्व घेतल्यास पक्षाघात आणि हृदविकाराच्या झटक्याची शक्यता वाढत असल्याचे अभ्यासात दिसून आले होते, असे चीनच्या झेंगझाऊ विद्यापीठाला प्रा. क्यू यमिंग यांनी सांगितले. या विषयावर अधिक संशोधन करण्यात आले. त्यात ब जीवनसत्त्वाचे सेवन केल्यानंतर पक्षाघाताचा झटका कमी होत असल्याचे आढळले. मात्र त्यासाठी शरीरातील अन्य घटकांच्या संतुलनाचा विचारही करावा लागतो. हे संशोधन अमेरिकन अँकॅडमी ऑफ नूरॉलॉजीच्या जर्नलमध्ये प्रसिध्द झाले आहे.


'B'जीवनसत्त्व रोखते पक्षाघाताचा झटका