बातम्या

शिर्डीत विठ्ठल भक्तीचा गजर! आषाढी एकादशीनिमित्त १२ टन खिचडीचा महाप्रसाद

Vitthal Bhakti s alarm in Shirdi Mahaprasad of 12 tons of khichdi on the occasion of Ashadhi Ekadashi


By nisha patil - 6/30/2023 1:42:46 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : शिर्डी: आषाढी एकादशी निमित्त काल शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयात खास साबुदाणाच्या महाखिचडीचा प्रसाद देण्यात आला आहे. तब्बल 11 ते 12 टन साहित्याचा वापर यासाठी करण्यात आला . सबका मालिक एक संदेश देणा-या साईबाबांच्या दर्शनासाठी काल  एकादशीच्या दिवशी भाविकांनी गर्दी केली आहे.आषाढी एकादशी हा उपवासाचा दिवस लक्षात घेऊन भाविकांसाठी आज खास साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला आहे.

सकाळी नाश्ता तसेच भोजनातही उपवासाची खिचडी देण्यात आली. साबुदाणा खिचडी ,शेंगदाण्याची आमटी काल  प्रसादलाय बनवली जात असून हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज घेत साईसंस्थानने तयारी केली आहे. खिचडीचा प्रसाद बनवण्यासाठी 12 टन उपवासाच्या साहित्याचा वापर करण्यात आलाय. साबुदाणा 6 हजार किलो , शेंगदाणे 5 हजार किलो, बटाटा 2 हजार किलो यासह साखर मिरचीचा वापर महाखिचडी बनवण्यासाठी वापरण्यात आले आहे.


शिर्डीत विठ्ठल भक्तीचा गजर! आषाढी एकादशीनिमित्त १२ टन खिचडीचा महाप्रसाद