बातम्या

कोतोलीच्या विवेक लव्हटे याने विवेकानंद काॅलेज मध्ये प्रथम क्रमांक पटकावला

Vivek Lovete from Kotoli bagged first position in Vivekananda College


By nisha patil - 5/23/2024 9:36:29 PM
Share This News:



 पन्हाळा :प्रतिनिधी पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील विवेक कुष्णात लव्हटे याने १२ वी कला शाखेत  90.83% गुण मिळवून काॅलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. विवेक लव्हटे हा विवेकानंद काॅलेज कोल्हापूर येथे शिक्षण घेत होता. सुरूवातीपासून त्याने अभ्यास चांगल्या प्रकारे केला. अभ्यासात सातत्य ठेवल्याने हे यश मिळविले आहे. याबद्दल विवेकचे सर्व स्तरांवर कौतुक केले जातं आहे.
 

पुढे तो वकिली व्यवसायात करिअर करत असल्याचे त्याने तारा न्युज शी  बोलताना सांगितले. याकरिता त्याला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, प्राचार्य आर.आर.कुंभार व विवेकचे वडील अॅड. कुष्णात लव्हटे यांचे मार्गदर्शन लाभले.


कोतोलीच्या विवेक लव्हटे याने विवेकानंद काॅलेज मध्ये प्रथम क्रमांक पटकावला