बातम्या

विवेकानंद महाविद्यालय व व्हाईट आर्मी यांच्यामध्ये सामंजस्य्‍ा करार संपन्न

Vivekananda College  White Army


By nisha patil - 4/5/2024 4:58:31 PM
Share This News:



विवेकानंद   महाविद्यालय व व्हाईट आर्मी, कोल्हापूर  यांच्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर आर कुंभार, व व्हाईट आर्मीचे संस्थापक मा.अशोक रोकडे यांच्या उपस्थितीत सामंजस्य्‍ करार करण्यात आला.  याप्रसंगी सामंजस्य्‍ करारांतर्गत मा.अशोक रोकडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.  यावेळी मार्गदर्शन करताना मा.अशोक रोकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन या संदर्भात मार्गदर्शन केले. 

विवेकानंद कॉलेजमध्ये या करारांतर्गत नवीन शैक्षणिक धोरण 2020 ला अनुसरुन आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम  महाविद्यालयातील कला, वाणिज्य्‍, विज्ञान शाखेच्या व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व  विद्यार्थ्यासाठी सुरु करण्यात आलेला आहे.  या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन संदर्भात व्हाईट आर्मीचे अधिकारी व स्वयंसेवक प्रात्य्‍क्षिकासह  प्रशिक्षण देणार आहेत.  याचा उपयोग विद्यार्थ्याच्या माध्यमातून समाजासाठी आपत्कालीन परिस्थितीत संकटाना सामोरे जाण्यासाठी होणार आहे.

          अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी ,आजच्या आव्हानात्म्‍क संघर्षाच्या काळात विद्यार्थ्यांनी सजग असणे गरजेचे आहे.  भविष्य्‍ उज्वल करण्यासाठी कौशाल्याधारित शिक्षण घेणे आवश्यक आहे.  राबविण्यात येणाऱ्या या अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यशस्वी व्हावे असे मत मांडले. 

          कार्यक्रमाची सुरुवात रोपटयास पाणी घालून झाली.  प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांची ओळख एन.सी.सी.प्रमुख प्रा जे आर भरमगोंडा यानी करुन दिली. यावेळी परीक्षा विभाग प्रमुख डॉ.जी.जे. नवाथे व प्रा.संदीप पाटील यांनी मनोगते मांडली.  आभार प्रा एन आर सणगर यांनी मानले.  सुत्रसंचालन कु. साक्षी कोळी व मेघा मगदूम यांनी केले. यावेळी व्हाईट आर्मीचे प्रशांत शेडे,  एन.सी.सी.प्रमुख प्रा एस एम भोसले, प्रा एस पी थोरात, डॉ डी आर तुपे, प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


विवेकानंद महाविद्यालय व व्हाईट आर्मी यांच्यामध्ये सामंजस्य्‍ा करार संपन्न