बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
By nisha patil - 4/15/2024 11:42:25 AM
Share This News:
कोल्हापूर : येथील विवेकानंद महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न्ा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.एच. व्ही. चामे म्हणाले, शिक्षणातून माणसाचा व्यक्तीमत्व् विकास होतो. म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. त्यांनी जगभरातील घटनांचा अभ्यास करुन आपल्या देशातील तळागाळातील वंचित, शोषित लोकांच्या प्रगतीसाठी भारतीय राज्यघटना लिहिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्मातील स्वातंत्र्य, समता व बंधूता या तत्वांचा अंगिकार करुन सर्व समाजाची प्रगती साधता येते. असे मत त्यांनी मांडले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार म्हणाले, विश्वातील सर्वश्रेष्ठ परिपक्व, निकोप लोकशाहीची तत्वे ज्यांनी भारतीय समाजास दिली आणि धर्मनिरपेक्ष, सार्वभौम राष्ट्रनिर्मितीकरीता आवश्यक असलेली समानतेची, सहिष्णुतेची तत्वे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समाजास देऊन लोकाना स्वत:च्या अधिकाराप्रती जागरुकता निर्माण केली. दलित, आदिवासी आणि स्त्रिया यांचेसाठी भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली त्यामुळे त्यांचा उद्धार झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षणसंस्था स्थापन केली त्यामुळे बहुजन समाजातील मुलामुलींच्या शिक्षणाची सोय झाली.
प्रास्ताविक व स्वागत प्रा. समीक्षा फराकटे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. दादासाहेब घाडगे यांनी मानले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील आधारित ग्रंथाचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग , एन.सी.सी. प्रमुख कॅप्टन् सुनिता भोसले, लेप्टनंट प्रा.जे आर भरमगोंडा, डॉ. कैलास पाटील, डॉ. संजय अंकुशराव, प्रा.एम.ए.कुरणे ज्युनिअर , सिनिअर कॉलेज मधील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी एन.सी.सी. कॅडेट उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
|