बातम्या

विवेकानंद महाविद्यालय उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून सन्मानित....

Vivekananda College Honored as Excellent College


By nisha patil - 6/3/2024 12:14:48 PM
Share This News:



विवेकानंद महाविद्यालय उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून सन्मानित....

कोल्हापूर: राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते विवेकानंद महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाजी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर आर. आर. कुंभार यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे , निवडणुक उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, प्र- कुलगुरू डॉ. पी एस पाटील उपस्थित होते. 

जिल्हा नोडल अधिकारी म्हणून विवेकानंद कॉलेजचे रा.से योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संदीप पाटील यांना उत्कृष्ट संपर्क अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख समीक्षा फराकटे उपस्थित होत्या. यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे,  संस्था सेक्रेटरी प्राचार्य शुभांगी गावडे व  सीईओ कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.


विवेकानंद महाविद्यालय उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून सन्मानित....