बातम्या

विवेकानंद कॉलेजचे एम.एच.टी. सीईटी परीक्षेत घवघवीत यश

Vivekananda College M H T  Great success in CET exam


By nisha patil - 6/19/2024 1:04:41 PM
Share This News:



एम.एच.टी. सीईटी परीक्षेमध्ये  विवेकानंद कॉलेजने अपूर्व यश संपादन केले. विवेकानंद कॉलेजचे तब्बल 400 पेक्षा अधिक विद्यार्थी अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले.  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा एम.एच.टी. सीईटी 2024 च्या निकालात

पीसीएम ग्रूप मध्ये 1)  अथर्व महेश करंबळी- 98.44   2) श्रध्दा भारत कुंभार - 98.33   3) ओम रमेश माने - 98.05   4) अल्तमाश मुश्ताक उस्ताद -97.50    5) आदित्य्‍ आनंद कालेल -97.44  पर्सेंटाइल गुण संपादन करुन यशस्वी ठरले.

 पीसीबी ग्रूप मध्ये   1) आदिती बाबासो पाटील- 99.03  2) सानिया अनिल लोहार – 98.80  3) देवेंद्र राजेंद्र गायकवाड – 98.38  4) प्रणिल प्रशांत हेबाळे – 97.80   5) शौमिका दत्तात्रय चव्हाण -96.14  पर्सेंटाइल गुण संपादन करुन यशस्वी ठरले. एकूण 70 विदयार्थ्यांनी 90 पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण  मिळवले आहेत.

या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. श्री.कौस्तुभ गावडे,  विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग यांनी  यशस्वी  विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.

या यशवंत गुणवंत विदयार्थ्यांना विज्ञान विभाग प्रमुख प्रा एम. ए. कुरणे, प्रा.गीतांजली साळुंखे डॉ. अश्विनी पाटील , प्रा.के.जे.शिंदे,  प्रा.एन.एन.हिटणीकर, डॉ. एल. ई नरोन्हा, डॉ.सौ.एम.बी.साळुंखे, आणि सर्व  प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.


विवेकानंद कॉलेजचे एम.एच.टी. सीईटी परीक्षेत घवघवीत यश