शैक्षणिक
विवेकानंद महाविद्यालयात एन.सी.सी. छात्रांचा सत्कार
By nisha patil - 10/2/2025 7:05:56 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात एन.सी.सी. छात्रांचा सत्कार
कोल्हापूर - विवेकानंद महाविद्यालयातील एन.सी.सी. छात्रांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्ली येथे निवड झालेल्या अंडर ऑफिसर समिधा घुगरे, आर्मी दिवस परेडसाठी निवड झालेल्या अंडर ऑफिसर निशा बजागे, तसेच जम्मू-काश्मीर येथे हिवाळी धाडसी खेळ प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतलेल्या अंडर ऑफिसर शरयू सुतार यांचा या वेळी गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अभिनंदन केले. या छात्रांना मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जे.आर. भरमगोंडा, आणि 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कर्नल संधान मिश्रा यांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद महाविद्यालयात एन.सी.सी. छात्रांचा सत्कार
|