बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
By nisha patil - 3/1/2025 11:11:41 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
कोल्हापुर दि. 3. येथील विवेकानंद कॉलेज मध्ये महिला सक्षमीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा च्या संयुक्त विदयमाने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त 'सावित्रीच्या आजच्या लेकी' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणुन प्रसिध्द किर्तनकार, लेखीका सौ राधीका कालेकर उपस्थीत होत्या. आपल्या व्याख्यानात मार्गदर्शन करताना त्या पुढे म्हणाल्या ,सावित्रीबाईनी घेतलेला स्त्री शिक्षणाचा वसा तेंव्हाच यशस्वी होइल जेव्हा समाजातील सर्व - स्त्रिया शिक्षणाचा उपयोग योग्य निर्णय घेण्यासाठी करतील, अनुभवाने सिध्द होतील, सदसदविवेवबुध्दी जागृत असणं म्हणजे खर शिक्षण होय.हे समजून घेतलं तरच सावित्रीबाईच्या वाटेवरून चालता येईल आणि हिच त्यांच्या प्रती खरी आदरांजली असेल.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .आर. आर. कुंभार यांनी समाजातील स्त्रियांची भूमिका अत्यंत महत्वाची असुन त्या आपली भूमिका सक्षमपणे निभावत असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर प्रशासनातही स्त्रीया खंबीर भुमिका बजावत आहेत असेही ते म्हणाले.
यावेळी प्रा.स्नेहल वरेकर व डिजिटल मीडिया च्या विद्यार्थीनींनी तयार केलेला व्हिडिओ जो महाविद्यालयातील विविध विभागाच्या विद्यार्थ्यांचे,प्राध्यापकांचे,प्रशासकीय कर्मचारी व प्राचार्य या सर्वांच्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रती असणाऱ्या विविध प्रतिक्रियां असणारा व्हिडिओ ही दाखविण्यात आला l.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संपदा टिपकुर्ले यांनी केले आभार डॉ.कविता तिवडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.सुप्रिया पाटील यांनी केले. यावेळी डॉ श्रुती जोशी, डॉ. कैलास पाटील, प्रा.स्नेहल वरेकर, रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
विवेकानंद कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
|