बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये शिक्षण सप्ताह अंतर्गत क्रीडा दिवस उत्साहात साजरा
By nisha patil - 7/24/2024 9:46:01 PM
Share This News:
राष्ट्रीय शिक्षण धोरण – 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे दिनांक 22 ते 28 जुलै 2024 अखेर शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद कॉलेजमधील माजी जिमखाना विभाग प्रमुख प्रा.किरण पाटील हे उपस्थित होते. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा विषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये कॉलेजचे जिमखाना प्रमुख डॉ.विकास जाधव यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे जीवनामध्ये असणारे अनन्य साधारण महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युनियर कॉलेजकडील आर्टस व कॉमर्स विभागाच्या प्रमुख प्रा.शिल्पा भोसले ह्या होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळाचे असणारे महत्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास शाळासिध्दी प्रमुख प्रा.गितांजली साळुंखे , सायन्स विभागप्रमुख प्रा.के.जे.गुजर, प्रा.एस.टी.शिंदे, , रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, डॉ.महेश कदम, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संतोष कुंडले यांनी केले तर आभार प्रा.समीर पठाण यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासकीय सेवक श्री.सुरेश चरापले, श्री.आर.एम.बोंगे यांचे सहकार्य लाभले.
विवेकानंद कॉलेजमध्ये शिक्षण सप्ताह अंतर्गत क्रीडा दिवस उत्साहात साजरा
|