बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार संपन्न
By nisha patil - 5/8/2024 8:57:06 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज अनेक वर्षे कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहिले आहे. तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द व चिकाटी या बळावर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतही उत्तुंग यश मिळविले आहे.या यशामुळे विवेकानंद महाविद्यालयाच्या व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या कॉलेजने आजपर्यंत अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, खेळाडू घडवले आहेत. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी सांगितलेली सत्य्, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणूकीस आळा या पंचसुत्रीचा अंगिकार करुन विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख कार्य करावे. असे मत स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी मांडले. ते येथील स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमासाठी आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी, या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने प्रयत्न् केले जातात. विदयार्थ्यांच्या गुणवत्तेला पैलू पाडून यशस्वी हिरा बनवले जाते. अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि सातत्याचे मार्गदर्शन व योग्य् अभ्यासपध्दती यामुळेच असे गुणवंत विदयार्थी घडल्याचे मत मांडले.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या प्रतिक्षा कदम, मयुरी पाटील, तेजस्विनी माणगावे यांचा, ज्युनि.असिस्टंट मॅनेंजर, IDBI Bank पदी निवड झालेली प्रियांका चौगुले यांचा, पुनम गिरी यांचा कृषी विभागात वरिष्ठ् सहाय्यक पदी निवड झालेबद्दल व शिवानी खाडे हिचा जलसंपदा विभागात कॅनॉल निरीक्षक पदी निवड झालेल्या एकूण सहा विद्यार्थिनींचा सत्कार करणेत आला.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे संस्थेच्या सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले व पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.स्वागत व प्रास्ताविक गणित विभागप्रमुख प्रा. एस.पी.थोरात यांनी केले. तर आभार प्रा. प्राजक्ता कुलकर्णी यांनी मानले. सुत्रसंचालन कु. नेहा शिंदे यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार संपन्न
|