बातम्या
शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
By nisha patil - 10/22/2024 11:29:51 AM
Share This News:
शिवाजी विद्यापीठातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आणि विदयार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी संलग्न् महाविद्यालयांसाठी उत्कृष्ठ वार्षिक नियतकालिक स्पर्धा आयोजित केली जाते. या नियतकालिकातून महाविद्यालयीन विद्यार्थी विविध साहित्य् प्रकारात लेखन व आपल्या कलेला अभिव्यक्त करत असतात.
या स्पर्धेत गेली अनेक वर्षे विवेकानंद महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये विवेकानंद कॉलेजच्या विवेक वार्षिक नियतकालिकाने बिगर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक पटकाविला. या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात मोठी भर पडली असून महाविद्यालयाने यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या नियतकालिकाचे संपादक म्हणून प्रा. डॉ.आरिफ महात यांनी काम पाहिले आहे. या नियतकालिकाच्या निर्मितीसाठी ज्युनिअर व सिनिअर विभागातील प्राध्यापकांच्या संपादक मंडळाचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, सी.ई.ओ.श्री.कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग,प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी संपादक मंडळ व सहभागी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
|