बातम्या

28 मार्च 2024 रोजी विवेकानंद कॉलेजचा गुणी विद्यार्थी गौरव समारंभ

Vivekananda College meritorious student felicitation ceremony on March 28


By nisha patil - 3/26/2024 3:24:04 PM
Share This News:



कोल्हापूर: 26 : महाविद्यालयातील शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी करणेत येतो.  या समारंभाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणा मिळते.  विवेकानंद महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2023-24 चा गुणी विद्यार्थी गौरव समारंभ गुरुवार दि. 28.03.2024 रोजी सकाळी 10.00 वाजता शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये संपन्न होत आहे.  या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द कथाकथनकार मा.आप्पासाहेब खोत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे आहेत. तसेच संस्थेच्या सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. मा. कौस्तुभ गावडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  तरी  या समारंभासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.एन.आर.सणगर, रजिस्ट्रार श्री. आर.बी.जोग. प्रा.सहिदा कच्छी, यांनी केले आहे.


28 मार्च 2024 रोजी विवेकानंद कॉलेजचा गुणी विद्यार्थी गौरव समारंभ