बातम्या
विवेकानंद कॉलेजचे जेईई मेन्स परीक्षेत घवघवीत यश
By nisha patil - 3/5/2024 4:41:11 PM
Share This News:
नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या जेईई मेन्स् परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये विवेकानंद कॉलेजचा विद्यार्थी अथर्व महेश करंबळी याने 93.45 पर्सेंटाईल मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. त्याच बरोबर ज्युनिअर कॉलेजमधील पाटील श्रावण सागर, अशय विठ्ठल पटकारे, ओम रमेश माने, ऋतुजा पांडुरंग ओऊळकर, राम अर्चनाकुमारी दरोगा, प्रणाली प्रदीप खाडे, , श्रुती महेश पाटील यांनीही या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. वरील सर्व विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स साठी पात्र झालेले आहेत.
या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे , संस्था सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.
या यशवंत गुणवंत विदयार्थ्यांना विज्ञान विभाग प्रमुख प्रा एम ए कुरणे, प्रा एम आर नवले, प्रा गीतांजली साळुंखे, प्रा एम आर काळेबाग प्रा एस टी शिंदे, प्रा पी एन कांबळे, प्रा एस एल पाटील , प्रा एस पी. पाटील, प्रा. के.जे.गुजर व ज्युनिअर सायन्स विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले
विवेकानंद कॉलेजचे जेईई मेन्स परीक्षेत घवघवीत यश
|