बातम्या
विवेकानंद कॉलेजने झोनल व इंटर झोनल महिला बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकाविले
By nisha patil - 10/10/2024 7:48:54 PM
Share This News:
के. आय.टी कॉलेज कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अतंर्गत कोल्हापूर विभागीय महिला बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेज ला विजेते पद मिळाले. तसेच दिनांक ०९.१०.२०२४ रोजी के.बी.पी. कॉलेज इस्लामपूर येथे घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय महिला बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर ला उपविजेते पद मिळाले.
या संघामध्ये कु.श्रृती लोहार (बी.कॉम.2), कु.श्रेया जाधव (बी.कॉम.1), कु.मोनिका नागदेव (बी.सी.एस.2), कु.भाग्यश्री आंबी (बी.सी.ए.1) आणि कु.प्राची मयेकर (बी.एस्सी.2) ह्या विद्यार्थिनी सहभागी होत्या. त्यांचे महाविद्यालयाच्या व संस्थेच्यावतीने कौतुक करण्यात आले.
या सर्व खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ.शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. श्री.कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव , प्रा.संतोष कुंडले, प्रा.समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, व श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद कॉलेजने झोनल व इंटर झोनल महिला बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकाविले
|