बातम्या
राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत विवेकानंद कॉलेजची दमदार कामगिरी
By nisha patil - 12/18/2024 3:26:11 PM
Share This News:
राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत विवेकानंद कॉलेजची दमदार कामगिरी
विवेकानंदच्या कृष्णा शेळके, धिरीजा मोरे, श्रीवर्धन पाटील, जय शहाची
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
कोल्हापूर : दि. 16 : दि. 4 ते 8 नोव्हेंबर 2024 रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी (पुणे) येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये विवेकांनद कॉलेज, कोल्हापूरच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत जलतरण स्पर्धेत वर्चस्व राखले. सांघिक जलतरण रिले क्रीडा प्रकारात :
19 वर्षाखालील मुली व मुले : 100 x 4 मिडले रिले व 100 x 4 फ्री रिले : रौप्य पदक
खेळाडू नावे : मुली : कृष्णा शेळके, धिरीजा मोरे, स्नेहल पाटील, रिया पाटील.
मुले : जय शहा, आदित्य कुंभार, प्रथमेश बेरड, श्रीकृष्ण शिंगाडे
· वैयक्तिक जलतरण क्रीडा प्रकार:
कु. कृष्णा शेळके : इ.12 वी कॉमर्स
· 100 मीटर बॅकस्ट्रोक : कास्य पदक , 400 मीटर फ्री स्टाईल : रौप्य पदक पटकावले.
कु. धिरीजा मोरे : इ.12 वी सायन्स
· 200 मीटर बॅक स्ट्रोक : रौप्यपदक, 400 मीटर फ्री स्टाईल : कास्य पदक
श्रीवर्धन पाटील : इ.12 वी सायन्स (17 वर्षांखालील मुले)
· 50 मीटर फ्री स्टाईल : सुवर्णपदक , 100 मी. फ्री स्टाईल : रौप्यपदक, 100 मी बटलफ्लाय : रौप्यपदक
जय शहा : इ.12 वी कॉमर्स
· 100 मी. बटरफ्लाय : सुवर्णपदक 50 मी. बॅकस्ट्रोक : सुवर्णपदक 100 मी. बॅकस्ट्रोक : रौप्यपदक
अशा प्रकारे कृष्णा शेळके, धिरीजा मोरे, श्रीवर्धन पाटील, जय शहा खेळाडूंची राजकोट येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या यशाबद्दल खेळाडूंचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे मॅडम, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे सर यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, रजिस्ट्रार श्री. आर. बी. जोग, श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत विवेकानंद कॉलेजची दमदार कामगिरी
|