बातम्या

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विवेकानंद महोत्सव...! प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार

Vivekananda Mahotsav for personality development of students


By nisha patil - 3/29/2024 2:12:42 PM
Share This News:



कोल्हापूर, दि: 29  स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे. सध्याचा काळ कौशल्य विकासाचा असून अशा काळात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. अशा काळात विवेकानंद कॉलेजने विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला आकार देण्यासाठी, त्याच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी विवेकानंद महोत्सव : शोध चैतन्याचा 2024 चे केलेले आयोजन महत्वपूर्ण आहे. असे उद्गार विवेकानंद महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी व्यक्त केले.  ते पुढे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नऊ हजार विद्यार्थी संख्या असणाऱ्या कॉलेजमध्ये असे अनेक नवोपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी या नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रास्ताविकात विवेकानंद महोत्सवाच्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी या महोत्सवाचा उद्देश कथन केला. विद्यार्थ्यांच्यात संशोधनवृत्ती वाढावी तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक समस्यांच्या निराकरणासाठीची जाणीव निर्माण व्हावी. स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची जिद्द व चिकाटी निर्माण करून त्याचा विकास होण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या फूड फेस्टिवलचे उदघाटन मा. प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. फूड फेस्टिव्हल मध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा खवय्यांची मनसोक्त आस्वाद घेतला. दोन दिवस संपन्न्‍ झालेल्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिवाचन, नाविन्यपूर्ण संशोधन, शॉर्ट फिल्म मेकिंग, एकपात्री या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.  याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मिस्टर अँड मिस विवेकानंद ही स्पर्धा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जल्लोषात संपन्न झाली.

अभिवाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. विदीरा विभूते व साक्षी कुलकर्णी , व्दितीय क्रमांक प्रतिज्ञा पालकर व तृतीय क्रमांक ऋषी डोंगरे  व सुयश झुणके यांना मिळाला.

एकपात्री स्पर्धेमध्ये  प्रथम क्रमांक प्रज्ञा कुलकर्णी , व्दितीय क्रमांक साक्षी चोथे, तृतीय क्रमांक प्रांजल जाधव यांना मिळाला. 

शॉर्ट फिल्म मेकींग स्पर्धेमध्ये  प्रथम क्रमांक अनुज पुनवतकर, व्दितीय क्रमांक पायल लांडगे,  तृतीय क्रमांक चेतन हेगाडे  यांना मिळाला.

नाविन्यपूर्ण संशोधन स्पर्धेमध्ये  प्रथम क्रमांक मुस्कान जमादार व शिवम काटकर ,  व्दितीय क्रमांक नाझिया देसाई व इंद्रायणी भादिगरे,  तृतीय क्रमांक दिपक गावडे व रसिका गायकवाड यांना मिळाला

मिस्टर विवेकानंद ॲण्ड मिस विवेकानंद स्पर्धेमध्ये  मिस्टर विवेकानंद म्हणून बी.एस्सी.भाग 1 मधील कु. ऋषिकेश शिंदे  तर मिस विवेकानंद म्हणून बी.ए.भाग 2 मधील कु. प्रणाली सुर्यवंशी यांची निवड झाली.

 या स्पर्धांमध्ये मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील विदयार्थ्यांचे संघ सहभागी झाले होते.  या स्पर्धांचे समन्वयक म्हणून डॉ.प्रदीप पाटील, प्रा.एच.व्ही.चामे, प्रा.डॉ.ए. एस. महात, प्रा. पल्लवी देसाई, प्रा.सनी काळे यांनी जबाबदारी पार पाडली. 

समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले तर आभार डॉ.एस.आर.कट्टीमनी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विवेकानंद महोत्सव...! प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार