बातम्या
विवेकानंद मध्ये विज्ञान दिन विविध उपक्रमांनी साजरा
By nisha patil - 2/3/2024 7:42:24 PM
Share This News:
विवेकानंद मध्ये विज्ञान दिन विविध उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर दि. 02: येथील विवेकानंद कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभागाच्या वतीने 28 व 29.2.24 रोजी विज्ञान दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. दि.28 रोजी बी.एस्सी.3 व एम.एस्सी.1 व 2 मधील विद्यार्थ्यांसाठी विविध शास्त्रज्ञांविषयी माहितीपर वक्तृत्व् स्पर्धा आयोजित करण्यात आली. विभागाच्या वतीने Biography Dr. C.V.Raman ही शॉर्ट फिल्म् दाखविण्यात आली. याप्रसंगी डॉ.सी.व्ही.रामन, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, डॉ.मेरी क्युरी, डॉ.स्वामीनाथन, डॉ.रॉबर्ट ओपनहायमर इ.शास्त्रज्ञांचा जीवनपट, त्यांचे कार्य शोध याचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करणेत आले.
दि.29 फेब्रुवारी 2024 रोजी बी एस्सी 3 व एम.एस्सी.1 व 2 मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध विज्ञान संकल्पनेवर आधारित भितीपत्रिका व विज्ञातील प्रतिकृतींच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये 78 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा परीक्षक म्हणून प्रा एस जी कुलकर्णी , डॉ टी सी पाटील यांनी काम पाहिले.
विभागप्रमुख डॉ.एस.डी.शिर्के यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष डॉ.ए.एस.कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. ए. ए. पत्रावळे यांनी आभार मानले. डॉ. ए. एस. तपासे यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार सुतार, वैष्णवी पाटील, शनीराज भुसनार, पूनम नरंदे, अनिकेत जाधव, मनोज कांबळे, अभिजीत लाड, ऋतुजा अतिग्रे आदि विद्यार्थ्यांनी वक्तृत्व् स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेच्या नियोजनासाठी विभागातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
विवेकानंद मध्ये विज्ञान दिन विविध उपक्रमांनी साजरा
|