शैक्षणिक

विवेकानंद महाविद्यालयात दि. 17 जानेवारी रोजी डॉ. अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान

Vivekananda college d On January 17 Dr Lecture by Achyut Godbole


By Administrator - 1/15/2025 4:41:05 PM
Share This News:



 

कोल्हापूर, दि. 15 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस 'ज्ञानशिदोरी दिन' म्हणून विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे 17 जानेवारी 2025 रोजी साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने जगप्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांचे "माझा लेखन प्रवास आणि आजचे शिक्षण" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता होईल.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे असतील. याप्रसंगी संस्थेच्या सेक्रेटरी  प्राचार्या  शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कोल्हापूर विभागप्रमुख  श्रीराम साळुंखे, संस्था पदाधिकारी, हितचिंतक, गुरुदेव कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच, या दिवशी महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी सर्वांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

 


विवेकानंद महाविद्यालयात दि. 17 जानेवारी रोजी डॉ. अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान
Total Views: 79