शैक्षणिक

विवेकानंद मध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता : आव्हान नव्हे संधी विषयावर व्याख्यान संपन्न

Vivekananda delivered a lecture on Artificial Intelligence


By nisha patil - 12/2/2025 3:59:07 PM
Share This News:



विवेकानंद मध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता : आव्हान नव्हे संधी विषयावर व्याख्यान संपन्न

 कोल्हापूर दि. 12 : कृत्रिम बुध्दीमत्ता (AI) आणि लर्निंग मशिन यांचा दैनंदिन जीवनात वापर वाढला आहे. त्यामुळे अनेक नवीन आव्हाने निर्माण होत आहेत.  परंतु त्याकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून बघितल्यास AI & ML बरोबर जगणे सुकर होईल. येणाऱ्या काळात AI & ML  चे महत्व्‍ अजून वाढणार आहे. मशिन लर्निंग ची मॉडेल्स्‍ तयार होताना त्यामागे संख्याशास्त्र हा अविभाज्य्‍ घटक आहे. आधुनिक युगामध्ये अनेक क्षेत्रात AI  चा वापर व व्यापकता वाढत आहे.  असे प्रतिपादन डॉ.एस.एस.सुतार, सहाय्यक प्राध्यापक  व सहा.संचालक YCSRD शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ.एस.जी.सपाटे , BSIET , कोल्हापूर हे होते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. सपाटे म्हणाले, संख्याशास्त्र विषयातील संकल्पना बुध्दीमत्ता आणि मशीन लर्निंग मध्ये अत्यंत महत्वाच्या असल्याचे नमूद केले.  कृत्रिम बुध्दीमत्ता हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक असून सर्व विद्यार्थ्यांनी हया विषयाचा मूळ गाभा समजून घेण्याचे आवाहन केले.   कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सौ वर्षा शिंदे, विभागप्रमुख, संख्याशास्त्र विभाग यांनी केले.  कार्यक्रमासाठी रजिस्ट्रार श्री. आर.बी.जोग यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.अशोक भोसले यांनी केले तर आभार प्रा.अतिश तानगावडे यांनी मानले.  सुत्रसंचालन कु. अस्मिता यादव  यानी केले.  याप्रसंगी प्रा.देवेंद्र पाटील, प्राअभिलाष पाटील,  प्रा.अमर मोरे, प्रा.पल्लवी रणसुभे , विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


विवेकानंद मध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता : आव्हान नव्हे संधी विषयावर व्याख्यान संपन्न
Total Views: 38