बातम्या
विवेकानंद मध्ये ‘महिलांसाठी वित्तीय नियोजन’ विषयावर व्याख्यान संपन्न
By nisha patil - 8/14/2024 5:56:37 PM
Share This News:
येथील विवेकानंद कॉलेजमध्ये महिला सबलीकरण कक्ष , श्रीमती सुशीलादेवी साळुंखे महिला अभ्यासकेंद्र अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व रोटरी क्ल्ब , कोल्हापूर यांच्या संयुक्त् विद्यमाने महिलांसाठी वित्तीय नियोजन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानास जयसिंगपूर येथील सी.ए. मोनिका बलदवा हया प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
वरील विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी महिलांची समाजातील भूमिका शिल्प्कारासारखी असून त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबरोबरच वितीय नियोजन करणे महत्वाचे आहे असे मत मांडले. गुंतवणूकीसाठी अर्थव्य्वस्थेमध्ये असणाऱ्या विविध मार्गांची माहिती देऊन महिलांनी कोणत्या प्रकारच्या गुंतवणूक कराव्यात, बचत आणि गुंतवणूकीतील फरक समजावून घ्यावा, सुरक्षित आणि योग्य् परतावा देणाऱ्या गुंतवणूक साधनांची निवड करावी. याबाबत माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या समन्व्यक डॉ. श्रुती जोशी यांनी स्वत: च्या व कुटूंबाच्या स्व्प्नांना पूर्ण करण्यासाठी वितीय नियोजनाचा अवलंब करुन सक्षम व्हावे. असे मत मांडले. कार्यक्रम संयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. संपदा टिपकुर्ले यांनी केले. आभार डॉ.वर्षा पवार यांनी मानले. सुत्रसंचालन डॉ. कविता तिवडे यांनी केले. यावेळी डॉ. रेवती पाटील, डॉ.उर्मिला खोत, डॉ.सरिता शिंदे, शिक्षक व शिक्षकेत्त्र महिला प्राध्यापक व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
विवेकानंद मध्ये ‘महिलांसाठी वित्तीय नियोजन’ विषयावर व्याख्यान संपन्न
|