बातम्या
विवेकानंद मध्ये "आजची युवा पिढी व समाज" या विषयावर व्याख्यान संपन्न
By nisha patil - 3/14/2024 12:52:49 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने "आजची युवा पिढी व समाज" या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी मार्गदर्शक म्हणून मा. श्री. संजय देवगोंडा पाटील, चिंचवाड हे उपस्थित होते.
यावेळी आपले विचार व्यक्त करत असताना श्री संजय देवगोंडा पाटील म्हणाले की, आजची चंगळवादी संस्कृती यामुळे आजचा युवा हा एका वेगळ्याच दिशेने भरकटत चाललेला आहे. समाज माध्यमाच्या प्रभावामुळे तो दिशाहीन झाला आहे. मोबाईल संस्कृती हे त्याला कारणीभूत आहे.आजचे समाज माध्यम आणि त्याचा अमर्याद वापर यामुळे जुन्या पिढीचे मूल्य आणि संस्कृती धोक्यात येत असलेली दिसत आहे. त्यामुळे समाजातील समस्या निवारणासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. सकारात्मक दृष्टीकोनामुळे समाजाची प्रगती होईल
समाजाला योग्य दिशेने न्यायचे असेल तर मुलांच्यामध्ये चांगल्या मूल्याची आणि संस्कृतीची जोपासना करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा समाजाचे स्वास्थ्य दिवसेंदिवस बिघडत जाणार यात शंका नाही.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर आर कुंभार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. एच्. व्ही. चामे समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी करून दिला. तसेच या प्रसंगी प्रा. संदीप पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर्या कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. घाडगे डी. के. यांनी केले . या कार्यक्रमासाठी विभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
विवेकानंद मध्ये "आजची युवा पिढी व समाज" या विषयावर व्याख्यान संपन्न
|