बातम्या
विवेकानंद मध्ये 'अंतर्गत तक्रार समितीचे कार्य व भूमिका' विषयावर व्याख्यान संपन्न
By nisha patil - 8/31/2024 11:52:54 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत्त) मध्ये अंतर्गत तक्रार समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अंतर्गत तक्रार समितीचे कार्य व भूमिका' या विषयावर बोलताना ॲड. कीर्ती पवार यांनी विशाखा कायदा, अंतर्गत तक्रार समितीची आवश्यकता तसेच अंतर्गत तक्रार समितीला असलेले अधिकार, तक्रार कशी मांडावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्त्री आणि पुरुष दोघांच्या भूमिका आणि समाजातील वास्तव शॉर्ट फिल्म द्वारे विशद केले.
अध्यक्षीय मनोगतात आय क्यू ए सी समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी काळानुसार बदलणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती मानव म्हणून जगेल तेव्हा सर्व समावेशक समाज निर्माण होईल. असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. उर्मिला खोत यांनी केले. आभार प्रा. वर्षा शिदे यांनी मानले. सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी केले. कार्यक्रम संयोजनासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
विवेकानंद मध्ये 'अंतर्गत तक्रार समितीचे कार्य व भूमिका' विषयावर व्याख्यान संपन्न
|