शैक्षणिक

 विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची छत्रपती राजाराम साखर कारखान्यास क्षेत्र भेट

Vivekananda students field visit to Chhatrapati Rajaram Sugar Factory


By nisha patil - 8/2/2025 2:24:12 PM
Share This News:



 विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची छत्रपती राजाराम साखर कारखान्यास क्षेत्र भेट

 कोल्हापूर दि. 08  विवेकानंद महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील बी.एस्सी. भाग-३ मधील विद्यार्थ्यांची ‘औद्योगिक क्षेत्र भेटी’ अंतर्गत छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास भेट दिली. इंडस्ट्रीयल केमिस्ट्री या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी साखर  उत्पादन प्रक्रियेतील विविध टप्पे प्रत्यक्ष पाहून समजावून घेतले. तसेच इथेनॉल निर्मिती विभाग व इतर उपपदार्थ उत्पादनाची माहिती घेतली.

या औद्योगिक क्षेत्र भेटीचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. डी. शिर्के, प्रबंधक   आर.बी.जोग  यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ए. एन. अंभोरे व . प्रा. एस. एस. कदम यांनी यशस्वी केले. याप्रसंगी  प्रा. सुमित लाड, प्रा. डी. एस. पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव आणि विद्यार्थी , विद्यार्थिनी उपस्थित होते. 


 विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची छत्रपती राजाराम साखर कारखान्यास क्षेत्र भेट
Total Views: 75