शैक्षणिक

विवेकानंदच्या शरयू सुतार हिची जम्मू काश्मिर येथील गिर्यारोहण कॅम्पसाठी निवड

Vivekanandas selection of Sharyu Sutar for a climbing camp in Jammu Kashmir


By nisha patil - 1/16/2025 8:07:15 PM
Share This News:



विवेकानंदच्या  शरयू सुतार हिची जम्मू काश्मिर येथील गिर्यारोहण कॅम्पसाठी निवड

 कोल्हापूर दि.16 :  विवेकानंद महाविद्यालयची एन सी सी छात्र  सिनिअर अंडर ऑफिसर शरयू सुतार , बी.एस्सी.कॉम्प्युटर सायन्स  हिची एन.सी.सी. मधून जम्मू काश्मिर येथे होणाऱ्या गिर्यारोहण आणि हिवाळी खेळ या साहसी प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तेथे तिला बर्फातील खेळांचे प्रशिक्षण मिळणार आहे. सदरचे दि. 2 जानेवारी ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत सुरु आहे.

या निवडीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य मा. अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी अभिनंदन केले. 

वरील छात्रास 6 महाराष्ट्र बटालियनचे कर्नल संधान मिश्रा,  मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा,  शरयूची आई सौ. विद्या सुतार  प्रबंधक श्री. रघुनाथ जोग यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.


विवेकानंदच्या शरयू सुतार हिची जम्मू काश्मिर येथील गिर्यारोहण कॅम्पसाठी निवड
Total Views: 99