बातम्या
विवेकानंदच्या विद्यार्थिनींचा साहसी उपक्रमात सहभाग
By nisha patil - 12/18/2024 10:36:04 PM
Share This News:
विवेकानंदच्या विद्यार्थिनींचा साहसी उपक्रमात सहभाग
विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थिनीं व स्टाफसाठी निसर्गाच्या सानिध्यातील साहसी ट्रेक पळसंबे , रामलिंग , गगनबावडा येथे आयोजन करण्यात आला होते. या ट्रेक मध्ये 30 छात्र, विद्यार्थीनी व स्टाफ उपस्थित होते.
या प्रसंगी त्यांनी के.टी.विअर धरण, रामलिंग मंदिर, 2 ज्योतिर्लिंग, कोरलेली शिल्पे इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. तसेच जैवविविधतेत नटलेल्या परिसराचा अनुभव घेतला. विविध पक्षी, जळू, दगडी फुलपाखरे, निवळी कीटक तसेच औषधी वनस्पती इत्यादी पाहावयास मिळाल्या.
याप्रसंगी गाईड श्री. राजेश गणपुले, मेजर सुनिता भोसले, डॉ. एस.एस.लठ्ठे, डॉ.सोमनाथ काळे, डॉ. कैलास पाटील, डॉ. एस.एस.अंकुशराव यांनी मार्गदर्शन केले. या ट्रेकच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर. आर. कुंभार यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच आयक्युएसी विभाग प्रमुख डॉ. श्रुती जोशी, लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, प्रबंधक श्री. रघुनाथ जोग, यांचे सहकार्य लाभले
विवेकानंदच्या विद्यार्थिनींचा साहसी उपक्रमात सहभाग
|