बातम्या

विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीस भेट

Vivekanandas students visit Kolhapur Agricultural Produce Market Committee


By nisha patil - 8/1/2025 6:39:26 PM
Share This News:



विद्यार्थ्यांना शेतमालाची खरेदी विक्री, व्यवहार, लिलाव पध्दती, बाजार समिती प्रणाली समजून घेण्यासाठी  विवेकानंद  महाविद्यालयातील  अर्थशास्त्र व कॉमर्स विभागातील भाग 3 च्या 50  विद्यार्थ्यानी  कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीस शैक्षणिक भेट दिली.  यावेळी विद्यार्थ्यांनी  शेतमालाची खरेदी विक्री, व्यवहार, लिलाव पध्दती, बाजार समितीच्या प्रणालीमध्ये शेतकरी, अडते, व्यापारी यांची भूमिका समजून घेतली.

 तसेच या भेटीअंतर्गत ई नाम योजने अंतर्गत केंद्र शासनाने ई ऑक्शन प्रणाली अंतर्गत कृषी विपणन, राष्ट्रीय बाजार योजना व समितीचे भावी प्रकल्प, गुळ बाजार इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांना देणेत आली.

यावेळी बाजारसमितीच्या श्री.जीवन जाधव व सुशांत पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संदीप पाटील यानी केले तर आभार प्रा,डॉ.कैलास पाटील यांनी मानले.  या भेटीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार  यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र व कॉमर्स विभागाच्या वतीने  प्रा.डॉ.कैलास पाटील, प्रा. अमोल मोहिते, प्रा.संदीप पाटील, प्रा सतीश चव्हाण, रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग यानी केले होते.  या वेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.


विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीस भेट
Total Views: 87