बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये मतदान जनजागृती मोहीम

Voting awareness campaign in Vivekananda College


By nisha patil - 12/18/2024 3:27:32 PM
Share This News:



विवेकानंद  कॉलेजमध्ये मतदान जनजागृती मोहीम

शनिवार दि.16.11.2024 रोजी समाजातील मतदारांमध्ये 'माझे मत, माझा अधिकार'या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी व मतदानाचे पवित्र कर्तव्यबजाविण्यासाठी विवेकानंद कॉलेज पासून नागळा पार्क, ताराबाई पार्क, जिल्हा परिषद मार्गे विवेकानंद कॉलेज या भागात मतदान जनजागृती मोहिमेचे रॅलीच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले. कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर. आर. कुंभार यांचे हस्ते मतदान जनजागृती मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. विवेकानंद कॉलेज कोल्हापूर व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपल्या मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या घोषणांच्या ब्रीद वाक्यांच्या माध्यमातून समाजामध्ये मतदान करणे आपले पवित्र कर्तव्य कसे आहे ? हे पटवून दिले.

 कॉलेजचे प्रबंधक मा. श्री. आर. बी. जोग, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. एल एस नाकाडी,जुनिअर विभागातील प्रा.आर. व्ही.घाटगे, प्रा. सौ. जी एस साळुंखे, प्रा.एस एस जगताप, प्रा.सौ. एस पी पंचभाई, प्रा.सौ.सी.सी. पाटील इत्यादी सहभागी झाले होते. तसेच या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी कॉलेजचे इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.


विवेकानंद कॉलेजमध्ये मतदान जनजागृती मोहीम