बातम्या
वि. मं. निगवे दु॥ शाळेच्या १५ विद्यार्थ्यांचे गणित प्राविण्य परीक्षेत धवल यश
By nisha patil - 10/1/2025 8:44:00 PM
Share This News:
वि. मं. निगवे दु॥ शाळेच्या १५ विद्यार्थ्यांचे गणित प्राविण्य परीक्षेत धवल यश
गणित अध्यापक महामंडळ (पुणे) यांच्या कोल्हापूर विभागामार्फत आयोजित श्री रामानुजन गणित प्राविण्य परीक्षेत वि. मं. निगवे दु॥ (ता. करवीर) शाळेतील १५ विद्यार्थ्यांनी प्राविण्यप्राप्त गुणवत्ताधारक म्हणून यश मिळवले आहे.या विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळावी म्हणून एम. के. इंजिनियरिंगचे मालक शरद बोडके आणि त्यांच्या पत्नी साक्षी बोडके यांनी चांगल्या प्रतीची घड्याळे भेटस्वरूपात देऊन सत्कार केला.
कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक रामदास पाटील यांनी बोडके दांपत्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
प्रमुख पाहुणे म्हणून पन्हाळा पोलिस सर्जेराव पाटील आणि मुलाणी उपस्थित होते.५ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शोभा पाटील. वैशाली माजगांवकर, आणि रामचंद्र कुंभार यांचाही यावेळी त्यांच्या विशेष कार्यासाठी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक, आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत निगवे दु॥ यांचे सहकार्य लाभले.या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
1)वरद दिनेश हत्तीकर - 80
२) कल्याणी महेश आडसूळ - 79
3) आख घनश्याम लाळे - 76
वरद अमर जाधव - 72
५) स्वरा दिपक कळंत्रे - ना
वसुंधरा दगडू काळे - 68
७) फिदा इन्ताज मुलाणी - 63
8) आदित्य अमर एकशिंगे – ६२
२) स्वराली बबन एकशिंगे - 62
10) आदित्य अमर किडगावकर -59
11) स्वरा परशुराम ओतारी - 57
१२) शुभ्रा भिकाजी कट्टे
13) दुर्वा आनंदा जासूद - 57 57
14) आरोही सचिन किडगावकर - ५७
१५) सई गोरखनाथ गायकवाड - 57
वि. मं. निगवे दु॥ शाळेच्या १५ विद्यार्थ्यांचे गणित प्राविण्य परीक्षेत धवल यश
|