बातम्या

पाऊले चालती पंढरीची वाट.......अखंड हरिनामाचा गजर करत दिंड्या पंढरपूरकडे रवाना

Walking the way to Pandhari Dindya left for Pandharpur shouting Harinama


By nisha patil - 6/20/2023 5:39:36 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  29 जून रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी टाळ मृदुंग आणि अखंड हरिनामाच्या गजरात विठ्ठल रुक्मिणीच्या दिंड्या पंढरी अर्थात पंढरपूरकडे राज्यभरातून रवाना होत आहेत.. कोल्हापूर शहरातील विविध भागातून देखील दिंड्या रवाना होत आहेत. भगवा ध्वज हाती घेतलेले वारकरी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला टाळकरी मृदुंग आणि विणेकरी मुक्कामाच्या ठिकाणी जेवण करण्यासाठी लागणारा शिधा भरलेली वाहने असा हा दिंडीचा लवाजमा कोल्हापूरतील प्रमुख रस्त्यावर पाहायला मिळतोय. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या आषाढी एकादशी निमित्ताने विठू माऊलीच्या भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक वर्षी कोल्हापूर शहरातून विविध ठिकाणाहून या वारकऱ्यांच्या दिंड्या रवाना होत असतात. यामध्ये प्रामुख्याने उत्तरेश्वर पेठ कसबा बावडा फुलेवाडी सोमवार पेठ गंज गल्ली कुंभार मंडप रंकाळा टॉवर आदींसह बालिंगा पाडळी येवती नागदेववाडी मरळी शिपेकरवाडी वाघवे या ग्रामीण भागातून देखील या दिंड्या आता रवाना होताना दिसत आहेत. या रखरखत्या उन्हात देखील संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संत नामदेवांचे अभंग म्हणत या वारकऱ्यांची पाऊले पंढरीची वाट धरत आहेत. एकूणच या भाविकांमध्ये भक्तिमय आणि उत्साही वातावरण दिसून येतंय.


पाऊले चालती पंढरीची वाट.......अखंड हरिनामाचा गजर करत दिंड्या पंढरपूरकडे रवाना