बातम्या

मानसिक तणाव दूर करायचाय ? निसर्ग आहे ना !

Want to relieve mental stress


By nisha patil - 3/16/2024 7:17:38 AM
Share This News:



सध्या जीवनशैलीमुळे मानसिक ताण, स्ट्रेस हा नित्याचाच झाला आहे. हा ताण दूर करण्यासाठी एखाद्या नैसर्गिक ठिकाणी केवळ २० मिनिटं वेळ घालवल्यास टेंशन फ्री होऊ शकता. संशोधकांनी हे अभ्यासातून सिद्ध केले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात फक्त २० मिनिटं घालवल्यास कोर्टिसोल स्ट्रेस हार्मोन्सची पातळी कमी होते. जर्नल ऑफ फ्रंटायर्स इन सायकोलॉजीमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी सहभागी व्यक्तींना आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा १० किंवा त्यापेक्षा जास्त मिनिटं निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यास सांगितलं. कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी तपासण्यासाठी सहभागी व्यक्तींचे निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याआधी आणि गेल्यानंतर २ आठवड्यातून एकदा लाळेचे नमुने घेऊन ८ आठवडे हा अभ्यास केला.

संशोधकांनी सहभागी व्यक्तींना ठिकाण, वेळ आणि कालावधी निवडण्याची मुभा दिली होती. तणावावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टींवर मर्यादा घालण्यात आल्या. एरोबिक एक्सरसाईज, सोशल मीडिया, इंटरनेट, मोबाई, वाचन, संवाद आदी करण्यास मनाई केली होती. या अभ्यासातून असे दिसून आले की, कोर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी २० मिनिटं पुरेशी आहेत. मात्र यापेक्षा जास्त वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवला तर त्यामुळे कोर्टिसोलची पातळी झपाट्यानं कमी होते. मात्र त्याच्या परिणाम कमी दिसून येतो. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यानं स्ट्रेस कमी होतो. मात्र किती वेळ निसर्गाच्या सान्निध्यात राहावं, कसं राहावं आणि कोणत्या निसर्गात राहावं आपल्यासाठी फायदेशीर आहे याबाबात माहिती नाही. यासाठी संशोधकांनी हा अभ्यास केला. यात असं दिसून आलं की स्ट्रेस हार्मोन्स कोर्टिसोलची पातळी कमी होण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात २० ते ३० मिनिटं घालवणं पुरेसं आहे.


मानसिक तणाव दूर करायचाय ? निसर्ग आहे ना !