बातम्या

वरणगेतील पदाधिकारी यांनी जपली सामाजिक बांधीलकी

Warange office bearers maintain social commitment


By nisha patil - 5/2/2024 10:10:23 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे करवीर  : वरणगे येथील विद्यामंदिर वरणगे शाळेच्या सन ८६ ८७ च्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याद्वारे शाहूवाडी येथील आश्रमशाळेतील मुलांचा 'अभंगाचा नाद  अभंगनाद' कार्यक्रम येथे आयोजित केला होता.
 

या स्नेहमेळाव्याप्रसंगी युवा नेते हनुमान विकास  चेअरमन रामकृष्ण पाटील, सुनील मासुर्ले यांनी प्रत्येकी ११ हजार अशी एकूण २२ हजार रु.ची रक्कम आश्रमशाळेला भेट देत सामाजिक बांधीलकी जपली. ६० विद्यार्थ्यासह शिक्षक पोवार,  काटकर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील, विनोद कनोजे, पांडुरंग पाटील-मिस्त्री, प्रकाश पाटील-ढवळे, तानाजी पाटील-ढवळे, अश्विन पाटील, संजय सुतार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी, पांडुरंग पाटील यांनी आभार मानले


वरणगेतील पदाधिकारी यांनी जपली सामाजिक बांधीलकी