बातम्या

कुंभोज परिसरात शेकडो भटक्या कुत्र्यांचा वावर, विद्यार्थी व महिलांना धोका सावधानतेचा इशारा

Warning of hundreds of stray dogs in Kumbhoj area


By nisha patil - 10/17/2024 7:27:05 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)  कुंभोज तालुका हातकलंगले येथे सध्या छत्रपती शिवाजीनगर  व शाहूनगर व माळभाग परिसरात भटक्या कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरली असून ,कुंभोज गावातील मेन चौक असणारे दीपक चौक व आंबेडकर चौकामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
       

त्यामुळे परिसरातील विद्यार्थी व महिलावर्गांना धोका निर्माण झाला असून हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने विद्यार्थी व महिला जखमी झाले आहेत. या अनुषंगाने सध्या कुंभोज परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर पाहता नागरिकांच्या भितीचे वातावरण पसरले असून दीपक चौक व आंबेडकर चौक परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी बाहेरगावी जातात त्याच पद्धतीने यातून महिला वर्गाचा ही वावर मोठ्या प्रमाणात असतो,
     

त्या ठिकाणी सदर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने महिलांना व विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला असल्याची चर्चा सध्या ग्रामस्थातून जोर धरत असून ग्रामपंचायत कुंभोज यांनी वारंवार प्रयत्न करून ही, अनेक वेळा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला आहे. परिणामी ही भटकी कुत्री सध्या हातकणंगले परिसरातील काही नामवंत संस्थांच्या माध्यमातून कुंभोज सह परिसरात सोडली जात असल्याची चर्चा असून यावरती ग्रामपंचायत कुंभोज यांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे. 
         

सध्या कुंभोज परिसरात 500 पेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांचा वावर असून सदर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीला मोठी आर्थिक तरतूद करावी लागते परिणामी सदर कुत्री बंदिस्त करून बाहेर नेऊन सोडल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर पुन्हा परिसरातील काही गावातून ही भटकी कुत्री कुंभोज परिसरात सोडली जातात. त्यामुळे ग्रामपंचायत कुंभोज यांना सदर भटकी कुत्रीही डोकेदुखी झाल्याचे चित्र दिसत असून यावरती उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी ही सक्रीय होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांनी बोलताना व्यक्त केले असून, सदर  भटकी कुत्री आपल्या गावात सोडत असताना कोणालाही आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करू अशी आश्वासन ही त्यांनी दिले आहे. 
 

 परिणामी सदर भटक्या कुत्र्यांच्या पासून शालेय विद्यार्थी व महिलांनी सावधान राहावे असा इशारा ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने कुंभोज सह परिसरातील ग्रामस्थांना देण्यात आला आहे.


कुंभोज परिसरात शेकडो भटक्या कुत्र्यांचा वावर, विद्यार्थी व महिलांना धोका सावधानतेचा इशारा