बातम्या

सभा मैदानाच्या विद्रूपीकरनासाठी होती काय?.. मंजीत माने

Was the meeting to deface the ground


By nisha patil - 2/23/2024 1:07:51 PM
Share This News:



 शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात 16 आणि 17 फेब्रुवारीला पार पडलं.या अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गांधी मैदानातील  जाहीर सभेने झाली. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी प्रशासनाकडून चार दिवस स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. मात्र सभा होऊन सहा दिवस उलटले तरी या मैदानातील कचरा अद्याप तसाच आहे.

त्यामुळ स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होतोय. विशेष म्हणजे ज्या मैदानात वक्त्यांनी भाषण करताना पवित्र धनुष्यबान  आपल्याकड आहे. शिवसेना आपलीच आहे असा दावा केला होता. त्याच मैदानाचे आजचे चित्र पाहिलं तर धनुष्यबाणाचे चिन्ह असलेले फ्लेक्स कचऱ्यात टाकण्यात आलेत.शिवाय चहाचे कप, फूड पॅकेटस, पक्षाचे चिन्ह असलेले सक्रार्फ शिवाय नेत्यांचे फोटो असलेले लहान बॅनर ,स्टिकर मैदानात अक्षरशः ढीग लागलाय.त्यामुळ आयोजकांनी गांधी मैदानात घेतलेली ही सभा मैदानाच्या विद्रूपीकरनासाठी होती काय?असा सवाल ठाकरे गटाच्या युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष  मनजीत माने यांनी केलाय...


सभा मैदानाच्या विद्रूपीकरनासाठी होती काय?.. मंजीत माने