बातम्या
कारखान्यामधून नदीत सोडणारे पाणी हानीकारक-डॉ.बी.एन रावण
By nisha patil - 2/24/2024 4:07:39 PM
Share This News:
कारखान्यामधून नदीत सोडणारे पाणी हानीकारक-डॉ.बी.एन रावण
कोतोली - कारखान्यामधून बाहेर पडणारे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडले जाते त्यामुळे शेती व मानवी जीवनासाठी ते हानिकारक ठरते त्यामुळे त्याच्यावरती प्रक्रिया करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.बी.एन.रावण यांनी केले.
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व रसायनशास्त्र विभागामार्फत भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी प्रा.डॉ.बी.एन.रावण बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव शिवाजीराव पाटील होते. यावेळी भित्तीपत्रकाची माहिती सानिका वरपे,सुप्रिया नाईक,प्रतीक्षा लगारे,शिवानी पाटील,राजश्री पाटील यानी दिली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणूनऍक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस. कुरलीकर प्रा.एम.वाय.पोवार होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत यानी केले तर आभार कु.शिवानी संजय मोहिते हिने मानले. श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये भित्तीपत्रक प्रकाशन प्रसंगी शिवाजीराव पाटील, डॉ.बी.एन.रावण,प्रा.एम.वाय.पोवार,मान्यवर
कारखान्यामधून नदीत सोडणारे पाणी हानीकारक-डॉ.बी.एन रावण
|