बातम्या

जत तालुक्यात ग्रामीण भागात पाणी टंचाई; ऐन हिवाळ्यात दुष्काळ!.. तर मग उन्हाळ्यात काय परिस्थिती?..

Water scarcity in rural areas in Jat taluka


By nisha patil - 4/12/2023 7:36:06 PM
Share This News:



राज्यभरात पाऊस झाला असला तरी  मात्र पावसाने न हजेरी लावलेला गाव तिल्याळ  हिवाळा सुरू आहे परंतु पाऊस नाही त्यामुळे पाणी नाही त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न नागरिक विचारत असल्याचे दिसत आहे. जत तालुका मात्र तहानलेलाच असल्याचं चित्र आहे. जत तालुक्यात तिल्याळ गावात पिण्याच्या पाण्यासाठी एक घागर भरेपर्यंत चावी समोर भांडण करत उभे राहावे लागते. पावसाने जिल्ह्याकडे सपशेल पाठ फिरविल्याने पेरण्या करणे तर दूरच, पण माणसांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून पाण्याची टंचाई सुरु आहे. कमी पावसाचा फटका जत तालुक्यातील तिल्याळ गावातील भागाला जास्त बसला असून कायम दुष्काळी अशी ओळख असलेल्या या भागातील ग्रामस्थांना जगण्यासाठी आता स्थलांतर करायची वेळ येऊ लागली आहे. 
 

पाऊस नसल्याने विहिरी, ओढे, नाले, कोरडे, पडले असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत असल्याचे दिसले. शेतात पाऊस नसल्याने पेरणी नाही त्यामुळे जगायचे कसे हा प्रश्न या लोकांसमोर असून आपल्या सोबत पशुधन कसे वाचवायचे या चिंतेत या भागातील बळीराजा आहे. किमान पिण्याचे पाणी तरी घ्यावे यासाठी पिण्याची पाण्याची भरण्यासाठी वाट पाहत बसावे लागत असून यामुळे रोजंदारीला जाणेही कठीण बनू लागले असल्याचे तिल्याळ येथील स्त्रिया सांगतात .


जत तालुक्यात ग्रामीण भागात पाणी टंचाई; ऐन हिवाळ्यात दुष्काळ!.. तर मग उन्हाळ्यात काय परिस्थिती?..