कृष्णेचे पात्र ऐन उन्हाळ्यात कोरडे पडल्याने पाणी टंचाईचे संकट

Water shortage crisis due to drying up of Krishnas tank in summer


By nisha patil - 5/25/2023 6:19:53 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  नेहमी तुडूंब भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पात्र ऐन उन्हाळ्यात मे महिन्यामध्येच कोरडे  पडल्याने, सांगली, मिरज आणि कुपवाड शहरावर पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. आयर्विन पूल ते बंधाऱ्यापर्यंत पूर्णतः नदीचे पात्र कोरडे पडले  आहे.दरम्यान, कोयना धरणात अवघा २० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलाय, त्यातच मान्सून लांबल्याने शहरावरील पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. वास्तविक पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मनपा पाणीपुरवठा विभाग आणि पाटबंधारे विभागाने नियोजन करणे गरजेचे होते. परंतु त्याबाबत गेल्या चार-पाच दिवसांपर्यंत नियोजन केले नव्हते. यामुळे सांगलीसह आसपासच्या नदी काठावरील गावांमध्ये पाणीउपसा आणि पुरवठ्याचे नियोजन कोलमडले. यामुळे शहरात पाणीउपशावर परिणाम होऊन, सांगली-कुपवाडमधील पाणीटाक्याही पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. परिणामी सांगलीतील काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. एकेकाळी भरभरून वाहणारी कृष्णा नदी यंदा मात्र कोरडी पडली आहे. धरणातून पाणी सोडले नसल्याने सांगलीत पाण्याची पातळी घटली आहे. पात्र कोरडे पडल्याने याचा उपयोग आता खेळाचे मैदान म्हणून केला जात आहे.


कृष्णेचे पात्र ऐन उन्हाळ्यात कोरडे पडल्याने पाणी टंचाईचे संकट speednewslive24#