ताज्या बातम्या
कोल्हापूरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद....
By nisha patil - 10/3/2025 2:05:55 PM
Share This News:
कोल्हापूरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद....
'अमृत' योजनेवरील क्रॉस कनेक्शनच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद....
कोल्हापूरातील ए, बी आणि ई वॉर्डाचा पाणीपुरवठा सोमवारी व मंगळवारी दोन दिवस बंद राहणार आहे. काळम्मावाडीतील योजना देखभाल दुरुस्ती व अमृत योजनेवरील मुख्य लाईनवरील क्रॉस कनेक्शनच्या कामामुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
सध्या शहराला काळम्मावाडी थेट पाईपलाईन आणि बालिंगा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. दर सोमवारी दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे याच दिवशी पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे महापालिकेचे नियोजन केले आहे. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सोमवारी काम पूर्ण झाले तर मंगळवारी कमी दाबाने आणि बुधवारपासून पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे. सी आणि डी वॉर्डाला पाणीपुरवठा नियमितपणे होणार आहे.
कोल्हापूरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद....
|